Wednesday, February 4, 2009

ठाणे जिल्ह्यात युतीचचं वर्चस्व

ठाणे जिल्ह्यात युतीचचं वर्चस्व
ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकील्ला. भारतात सर्वाधिक विधानसभा मतदार संघ याच जिल्ह्यात आता पर्यंत या जिल्ह्यातून दोन खासदार जिल्ह्याचे दिल्लीत प्रतिनिधित्व करायचे आता मात्र नवीन मतदार संघांच्या रचनेनूसार चार खासदार ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व दिल्लीत करणार आहे. सहा महानगर पालिका आणि २४ विधानसभा मतदार संघ असलेल्या या मतदार संघाकडं सर्वांचचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या राजकारणात ठाणे जिल्हा महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळं या जिल्ह्यात सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळं आता आपण चला जाऊया ठाणे जिल्ह्याची राजकीय माहिती घेण्यासाठी........... गेल्या निवडणूकीत जुन्या मतदार संघापैकी ठाण्यात शिवसेना, तर डहाणूत क़ॉंग्रेस विजयी झाली. आता चार लोकसभा मतदारसंघ झाल्यानं मतदार संघाचा आकार कमी झाला. त्याचवेळी जिल्ह्यातील विधानसभेचे मतदारसंघ ११ ने वाढून २४ झाले. त्यामुळे राज्याच्या सत्ताकारणात या जिल्ह्याची भूमिका यापुढे निर्णायक ठरणार आहे. जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिका तसेच बहुतांशी नगरपालिका युतीच्या ताब्यात आहे. शिवसेनेचे तीन व भाजपाचे दोन आमदार आहेत. शिवसेनेचे तीन व भाजपचे दोन आमदार आहेत. शहरी व ग्रामिण भागात शिवसेना व भाजपची संघटनाबांधणी चांगली आहे. ठाणे, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, बदलापूर हि शहर तर युतीचे बालेकिल्लेच समजले जातात. शिवाय श्रमजीवी संघटना, कुणबी सेना, आगरी सेना या संघटनांचे बळ युतीच्या दिमतीला आहे. मध्यमवर्गीयांबरोबरच आगरी, भंडारी, कोळी हे समाज युतीच्या बरोबर असल्याने ठाणे जिल्ह्यातील चारही मतदासंघात युती वरचढ आहे. युतीपाठोपाठ राष्ट्रवादीने जिल्ह्यात ताकद वाढविली असून नवी मुंबईचा समावेश असलेला बेलापूर, मुरबाड, डहाणू, अंबरनाथ, शहापूर या जुन्या पा़च विधानसभा मतदार संघात या पक्षाचे आमदार निवडून आले आहेत. जिल्हा सहकारी बॅंक, जिल्हा परिषद, नवी मुंबई, महापालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे आहे. एकेकाळी आदिवासी, अल्पसंख्यांक, कुणबी, दलित हे कॉंग्रेसचे परंपरागत मतदार असले तरी संघटना बांधणीकडे दुर्लक्ष झाले असून नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची वाणवा आहे. त्यामुळे समर्थक वर्गजातीही दुरावल्याने सध्या जिल्ह्यात क़ॉंग्रेसचा एकही आमदार नाही. आदिवासी पट्ट्यातील या पक्षाची कॉंग्रेसची पकड दिवेसंदिवस ढिली होत चालली आहे. कॉंग्रेस पक्ष दुबळा झाल्याने आघाडीची ताकद तुलनेने कमी दिसते.